तुम्हाला माहित असेल कि फेसबुक या जगप्रसिद्ध सोशल नेटवर्किंग वेबसाईट ने २ वर्षांपूर्वी WhatsApp हे अप्लिकेशन विकत घेतले. आता तुमच्या मोबाईल मधील सर्व नंबर जसे च्या तसे WhatApp कडे नावासह उपलब्ध आहेत. पण पूर्वीच्या नियमावलीनुसार हे फोन नंबर WhatsApp शिवाय इतर ठिकाणी, जसे कि फेसबुक, करिता वापरता येत नाहीत.
परंतु आता जर तुम्ही नवीन नियमावलींना मान्यता दिली तुमचा व तुमच्या इतर सर्व मित्रांचे मोबाईल नंबर फेसबुक विविध कारणासाठी वापरू शकते.
उदाहरणार्थ: तुमचे WhatsApp वर जे मित्र आहेत ते सर्व फेसबुक वर आहेत काय? नसतील तर फेसबुक तुम्हाला फ्रेंड सुचवू शकते. तुम्ही WhatsApp ग्रुप वर ज्या विषयी चर्चा करता त्या संदर्भात जाहिराती फेसबुक वर दाखवणे व इतर अनेक प्रकार...
म्हणून जर तुम्हाला हि माहिती फेसबुक सोबत शेअर करायची नसल्यास पुढीप्रमाणे सेटिंग करा:
- WhatsApp मधील Setting मध्ये जा
- Accounts च्या वर क्लीक करा
- sharing the data with facebook ला असलेली टिक काढून Agree वर क्लिक करा
- share my account info वरील ✅ खूण काढून टाका.
- जर तुम्ही असे न करता AGREE चे बटन दाबले असेल तर लक्षात ठेवा तुम्ही Whatsapp ला तुमचा फोन नंबर facebook वर जोडण्यास आणि माहिती पुरविण्यास परवानगी दिली आहे
अधिक माहितीसाठी कमेंट करा किंवा फेसबुक वर फॉलो करा..
धन्यवाद, खूप महत्वाची माहिती दिली.
उत्तर द्याहटवा