शनिवार, ४ ऑगस्ट, २०१८

by Updated on शनिवार, ४ ऑगस्ट, २०१८ Leave a Comment

मोबाईल वरील त्रासदायक जाहिराती बंद करा सहजासहजी


तुमच्या Android मोबाईल वरदिसणाऱ्या सर्व प्रकारच्या जाहिराती पूर्णपणे बंद करता येऊ शकतात. अगदी सहज.
तुमच्या Android मोबाईल वर सतत दिसणाऱ्या जाहिराती, वेगवेगळ्या मार्गाने समोर येऊन मोबाईल वापरण्याचा आनंद हिरावून घेतात आणि मोबाईल वापरकर्त्याचा डाटा पण चोरी करतात.
यावर अगदी सोपा पण १०० % खात्रीशीर उपाय आहे.


मोबाईल वर जाहिराती २ प्रकारे दाखवल्या जातात. जेंव्हा तुम्ही क्रोम किंवा फायरफॉक्स वापरून वेगवेगळ्या वेबसाईट पाहता त्यावेळी वेबसाईट वर दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती व एखादे अॅप्लिकेशन वापरताना त्यामध्ये दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती.

दोन्हीप्रकारच्या जाहिराती कशा बंदकरायच्या ते आपण पाहू.

वेबसाईट बघताना दिसणाऱ्या जाहिराती:

याकरिता तुम्हाला Firefox हा ब्राउजर वापरावा लागेल. आपण जर क्रोम वापरत असाल तर त्यामध्ये हि सुविधा नाही.

प्रथम प्ले स्टोअर मधून फायरफॉक्स डाऊनलोड करा. डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा.
 block-adnroid-ads
  • यानंतर तुम्हाला फायरफॉक्स मध्ये जाहिराती ब्लॉक करणारे extension इंस्टॉल करावे लागेल.फायरफॉक्स ब्राउजर वापरून या लिंक वर जा. https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/ublock-origin/ 
  • याठिकाणी uBlock Origin extension इन्स्टॉल करा
  • Add to Firefox या बटन वर क्लिक करा. uBlock Origin extension तुमच्या फायरफॉक्स मध्ये जमा होईल. 
आता तुम्हाला कोणत्याही वेबसाईट वर कोणतीही जाहिरात दिसणार नाही. जाहिराती विना इंटरनेट वापरा.

वेगवगळ्या अॅप्लीकेशन मध्ये दिसणाऱ्या जाहिराती:


केवळ एक पूर्णपणे मोफत असलेल अॅप वापरून तुम्ही सर्व त्रासदायक जाहिरीती कायमच्या बंद करू शकता.

Blokada हे अॅप वापरून आपल्या मोबाईल वरील सर्व प्रकारच्या जाहिराती कायमच्या बंद करता येतील. आपला डेटा चोरी होणे देखील बंद होईल. किती जाहिराती ब्लाॅक केल्या गेल्या आहेत याची माहिती देखील दाखवली जाईल.
सर्व प्रकारच्या जाहिराती काढून टाका तुमच्या मोबाईल वरून
  • Blokada हे अत्यंत सुरक्षित, ओपन सोअर्स  application आहे. 
  • परंतु जाहिराती विरोधी कोणतेही  application गुगल प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध नसल्यामुळे हे अॅप देखील प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध नाही. 
  • डाऊनलोड करण्यासाठी वेबसाईट ला भेट द्या. http://blokada.org/ किंवा थेट Blokada डाऊनलोड करून इन्स्टॉल करण्यासाठी या लिंक वर जा.
  • अॅप्लिकेशन इंस्टाल झाल्यानंतर ओपन करा व आवश्यक ते सेटिंग करा.
BLOKADA वापरून सर्व प्रकारच्या सर्व जाहिराती १००% बंद केल्या जातात. हे अॅप्लीकेशन पूर्णपणेमोफत व सुरक्षित आहे.

माहिती उपयोगी वाटल्यास शेअर करायला विसरू नका.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा