सोमवार, १५ जून, २०२०

by Updated on सोमवार, १५ जून, २०२० Leave a Comment

कॅम स्कॅनर ला पर्याय असलेली उत्कृष्ट आणि मोफत डॉक्युमेंट्स स्कॅनर Apps

काही दिवसांपूर्वी कॅम स्कॅनर ॲप तुमची खासगी माहिती चोरत असल्याबद्दल बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यात सत्यता असल्याचे पुरावे सदर झाल्यानंतर अनेक Android युजर्सनी हे App आपल्या मोबाईल मधून काढून टाकले. परंतु कॅम स्कॅनर पेक्षाही उत्कृष्ट आणि सुरक्षित असलेले डॉक्युमेंट स्कॅनर अँड्रॉइड ॲप्स पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत आणि हि Apps पूर्णपणे सुरक्षित आहेत. 
कॅम स्कॅनर ला पर्याय असलेली उत्कृष्ट आणि पूर्णपणे मोफत असलेली ॲप्स जी तुम्ही डॉक्युमेंट्स स्कॅनर म्हणून  वापरू शकता.
Best camera  document scanner

कोणतेही कॅमेरा डॉक्युमेंट स्कॅनर ॲप मध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट बघावी लागते ती म्हणजे ते अप्लिकेशन ऑटोमॅटिक एज डिटेक्शन करते का व त्यानुसार केवळ फोटो क्रॉप करून सहजरित्या डॉक्युमेंट स्कॅन करू शकते काय? हि सुविधा नसल्यास ते डॉक्युमेंट्स स्कॅनर एप्लीकेशन आणि इतर इमेज एडिटिंग ॲप्लिकेशन मध्ये काहीच फरक राहणार नाही. 
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा कागद जो आहे त्याच्या चारही बाजू सहजरीत्या ॲप मधून डिटेक्ट झाल्या पाहिजेत जेणेकरून केवळ कागदाचा भागच होईल आणि इतर अनावश्यक आजूबाजूचा भाग काढून टाकला जाईल. त्याच बरोबर फोटो कोणत्याही अँगलमधून जरी काढलेला असेल तरी आपोआप दूर झालेली बाजू आणि मोठी झालेली बघून दोन्ही बाजू समान होऊन व्यवस्थित स्कॅन केल्याप्रमाणे सपाट पातळीवरील इमेज तुम्हाला मिळेल.

प्ले स्टोअर मध्ये अनेक इतर अप्लिकेशन उपलब्ध आहेत जी स्कॅनर म्हणून वापरता येतात परंतु त्यामध्ये जर ऑटोमॅटिक एज डिटेक्शन आणि नसेल तर त्यांचा डॉक्युमेंट स्कॅनर म्हणून काहीही उपयोग नाही. अशाप्रकारचा असलेले सुप्रसिद्ध कंपन्यांकडून बनवलेले तीन एप्लीकेशन मी तुम्हाला सजेस्ट करू इच्छितो. 

मायक्रोसोफ्टऑफिस लेन्स 

Microsoft-office-lens-edge-detection

यामध्ये अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने एज डिटेक्शन केले जाते आणि केवळ आवश्यक माहिती असलेला कागदच बरोबर क्रॉप केला जातो. याची अंतिम तयार होणारी इमेज अत्यंत उत्कृष्ट कॉलिटी आहे आणि स्कॅन केलेली डॉक्युमेंट तुम्ही पीडीएफ, इमेज आणि इतर वेगवेगळ्या प्रकारांमध्ये सेव्ह करू शकता. अनेक पाने असलेले डॉक्युमेंट सुद्धा तुम्ही एकाच वेळेला स्कॅन करून त्याची पीडीएफ फाईल बनवू शकता. हे ॲप्लिकेशन पूर्णपणे मोफत आहे आणि सुरक्षित देखील आहेत कारण याच्या पाठीमागे मायक्रोसोफ्ट सारखी कंपनी आहे.

Adobe स्कॅन

Adobe-Scan

जे लोक फोटोशॉप किंवा Adobe विविध सूटस वापरतात त्यांच्यासाठी हाय क्वालिटी डॉक्युमेंट बनवण्यासाठी Adobe स्कॅन  हे एप्लीकेशन सुविधेचे आहे. जर तुमच्याकडे Adobe अकाउंट पूर्वीपासून असेल किंवा तुमच्याकडे तुम्ही इतर सॉफ्टवेअर जसे की फोटो वगैरे वापरत असेल तर हे ॲप्लिकेशन त्यांच्या इतर सुविधा उपलब्ध करून देते.  याच्यामध्ये देखील अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने इमेज स्कॅन केली जाते. वेगवेगळ्या बजुनी स्कॅन केलेली इमेज समतोल भागावर आणून सपाट केली जाते ज्यामुळे तुम्हाला जणू काही एखादा कागद स्कॅनर मध्येच केला आहे अशा प्रकारची प्रतिमा मिळते. याच्यामध्ये वेगवेगळे फिल्टर देखील तुम्ही वापरू शकता. त्याच प्रमाणे फोटो क्लीअर नसल्यास त्याच्यामध्ये इमेज एडिटिंग करून फिल्टर वापरून तुम्ही जास्त क्लिअर फोटो इमेज बनवू शकता.  हे एप्लीकेशन सुद्पूधा र्णपणे मोफत आहे परंतु त्याकरता Adobe अकाउंट ओपन करणे आवश्यक आहे.

गुगल ड्राईव्ह स्कॅन

त्यानंतर तिसरीची एप्लीकेशन आहे ते गुगल ड्राईव्ह.  जर तुमच्या मोबाईल मध्ये Google Drive पूर्वीपासून इन्स्टॉल असेल तर गुगल ड्राईव्ह मध्येच स्कॅनर ही सुविधा पूर्वीपासूनच आहे. जी तुम्हाला सहजासहजी दिसून येणार नाही परंतु ती पूर्वीपासूनच त्यामध्ये आहे. यासाठी तुम्हाला कोणते नवीन ॲप्लिकेशन इन्स्टॉल करण्याची गरज नाही. यामध्ये स्कॅन केलेल्या डॉक्युमेंट इमेज मध्ये सेव करता येत नाहीत परंतु त्याच्यापासून पीडीएफ बनवून तुमचे तुमच्या गुगल ड्राईव्ह च्या अकाउंटला पीडीएफ सेव केली जाते.
Google Drive Scanner

हे वापरायला थोडे अवघड आहे आणि फिचर देखील कमी आहेत परंतु जर तुम्ही कधीतरीच स्कॅंनेर वापरत नसाल आणि क्वचित एखादी फाइल स्कॅन करत असेल तर नवीन एप्लिकेशन्स install करण्या ऐवजी गुगल ड्राईव्ह मध्ये असलेली सुविधा वापरून तुम्ही डॉक्युमेंट स्कॅन करू शकता.  याकरिता फक्त तुम्हाला गुगल ड्राईव्ह  हे एप्लीकेशन ओपन करून खालच्या कोपर्यात असलेल्या प्लस बटन ला टच / क्लिक करा आणि तिथे तुम्हाला स्कॅन नावाचा ऑप्शन दिसेल.

वर उल्लेख केलेल्या तीन डॉक्युमेंट्स स्कॅनर व्यतिरिक्त ईतर दोन आणखीन स्कॅनर आहेत. ती डॉक्युमेंटस स्कॅन  करत नाहीत परंतु करून त्याचा उपयोग वेगळ्या पद्धतीने खूप महत्त्वाचा. यामध्ये पहिले म्हणजे गुगल फोटो स्कॅनर  आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे गुगल लेन्स  स्कॅनर.

गुगल फोटो स्कॅनर

डॉक्यूमेंट स्कॅन करणे आणि फोटो स्कॅन करणे यामध्ये फरक आहे. फोटोमध्ये कलर, कोन, जुना फोटो चा कलर या बाबींवर लक्ष द्यावे लागते. यासाठी तुमच्याकडे जुने फोटो असतील आणि ते तुम्ही डिजिटल स्वरुपात सेव्ह करू इच्छित असाल तर गुगल फोटो स्कॅनर हे सर्वोत्तम पर्याय आहे.
गुगुल फोटो स्कॅनर ने स्कॅन केलेले सर्व फोटो गुगल फोटोज मध्ये अपोआप सेव्ह केले जातात. जुने फोटो स्कॅन करण्यासाठी यापेक्षा उत्तम पर्याय असू शकत नाही.


गुगल लेन्स


तुमच्याकडे अँड्रॉइड ८.० किंवा त्यापेक्षा नवीन व्हर्जन असेल किंवा तुम्ही जर गुगल फोटोज पूर्वीपासून वापरात असाल तर जास्त शक्यता आहे की गूगल लेन्स तुमच्या मोबाईल मध्ये पूर्वीपासून इनस्टॉल आहे.

परंतु जर पूर्वीपासून गूगल लेन्स तुमच्या मोबाईल मध्ये नसेल तर तुम्ही इथून डाऊनलोड करून घेऊ शकतात.

गुगल लेंस हे Artificial Intelligence वापरून काम करणारे App आहे त्याच्यासमोर. तुम्ही कोणताही फोटो, कोणतीही वस्तू किंवा कोणतेही स्कॅन केले डॉक्युमेंट धरा किंवा तुमच्या गॅलरी मधले फोटो गुगल लेन्समध्ये शेअर करा त्या फोटोमध्ये असलेलं कोणतंही ऑब्जेक्ट गुगल लेंस सहजपणे ओळखू शकतो. उदाहरणार्थ तुम्ही एखादा फुलाचा फोटो दाखवला तर ते फूल कोणते आहे, कोठे आढळून येते, कालावधी, झाडाचे नाव, त्याप्रकारची इतर फुले, इतर फोटो आणि त्याच्याबद्दल इतर सर्व माहिती तुम्हाला तत्काळ मिळते. गुगल लेंस चा अधिक वापर करून कायकाय करू शकता हे पाहण्यासाठी हि पोस्ट वाचा.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा